Skip to main content

■आषाढी अमावस्या■■      ●●दिव्यांची पूजा●●

■■आषाढी अमावस्या■■
     ●●दिव्यांची पूजा●●

दि.31-7-2019 रोजी बुधवारी
दुपारी 12 वाजेपासून ही दिव्याची अमावस्या सुरू होत आहे. त्याच कालावधीत पुनर्वसू नक्षत्र 2 वाजून 41 मिनिटापर्यंत असून  पुष्य नक्षत्र त्यानंतर लागलेले असेल.चंद्र कर्केत असेल त्याचवेळी रवि,मंगळ,शुक्र हेही कर्क राशीत आहेत.तर अशा या मुहूर्तावर म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजे नंतर ही पूजा करावयाची आहे. ही पूजा करताना काय करावे याबाबत मी जे सांगणार आहे त्याच्याशी इतरांनी सहमत असावे अशा माझा मुळीच आग्रह नसेल. प्रत्येक व्यक्तीच्या मनाला पटणे न पटणे यावर ते अवलंबून असेल.!!

ही पूजा करण्यापूर्वी आपल्या घरातील सर्व कोपरे स्वच्छ करून सर्व केरकचरा एका पिशवीत भरावा.एक कडुलिंबाचा फाटा घेऊन घरातील सर्व भाग व  कोपरे झाडावे.तो फाटा व केरकचरा जमा केलेली ती पिशवी आपल्या घरापासून
दूर नदीच्या ,तलावाच्या किंवा विहिरीच्या पाण्यात विसर्जन करावी.हे करताना आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती आपण विसर्जित करत आहोत ही भावना लक्षात घ्यावी.
पाणी जवळ नसेल तर दूर चौरस्त्याचे बाजूला ती कचर्याची पिशवी ठेऊन त्यावर तो फाटा ठेवावा.फाटा ठेवताना मनात साचून राहिलेल्या विशिष्ट नकारात्मक भावना,राग व्यक्त करून तो फाटा त्या केराच्या पिशवीवर आपटून ठेवावा.

घरातील सर्व जुने दिवे घासून चकचकीत करावे.घरात सर्वत्र
गोमूत्र शिंपडावे.शुचिर्भूत होऊन
पूर्वाभिमुख आपल्या समोर एका चौरंगावर तांदूळ पसरावे.मोठ्या दोन समया आपल्या उजव्या व डाव्या बाजूला चौरंगावर मांडून त्यात तेलवाती लावाव्यात. छोट्या छोट्या दिव्यात तुपाचे दिवे लावावेत. घरातील जेवढे मेंबर असतील तेवढे दिवे असावेत.त्या दिव्याच्या खाली प्रत्येकानी आपल्या मनातील इच्छा लिहिलेली चिठ्ठी ठेवावी.
दिव्याची पूजा करताना प्रथम
दिवे सर्व लावावे.त्याची पंचोपचार पूजा करावी.
धूप नैवेद्य दाखवावा.आणि पुढील प्रार्थना करावी---!

#भो #दीप #ब्रह्मस्वरूपम् #ज्योतिषाम् #प्रभुरव्याः ।
#यावत् #मम  #समस्या #समाप्तियात् #तावत्वं #सुस्थिरो #भव।।

हे ! दीपदेवता !! माझ्या मनातील
त्रासदायक समस्या समाप्त होईपर्यंत तू अग्नीस्वरूपात व ज्ञान स्वरूपात माझ्या पठीशी
स्थीरपणे राहून माझे रक्षण कर!!

मोठ्या श्रद्धेने ही पूजा करावी.
याशिवाय कथा कहाण्यांना अनुसरून बर्याच माता भगिनी मातीच्या दिव्यात तेलवाती लावतात. कहाणीतील राजाच्या सुनेला हाकलून दिल्या नंतर तिने मातीच्या दिव्याची पूजा केली होती व बाभळीच्या झाडाखाली
ती पूजा केली होती.म्हणून बाभळीच्या पिवळ्या फुलाचे महत्त्व आहे.आजही ही  प्रथा खूप ठिकाणी चालू आहे.

एकंदरीत पवित्र व दुःखहारी अशा या आषाढी अमावस्येला #गटारी असे विकृत रुप आजकाल दिलेले आहे.त्याबद्दल चर्चा करणे म्हणजे गटारीतील घाण तोंडात असल्याचे लक्षण आहे. ही अमावस्या झाल्यावर पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो आहे. यात खूप काही उपासना साधना आपणास करावयाच्या आहेत.हे एक प्रकारचे मानसिक शुद्धीकरण आहे एवढेच लक्षात घ्यावे.

           *🙏|| श्री गुरुदेव ||🙏*

Comments